देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत देशात 86 हजार 432 नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 86 हजार 432 करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाख 23 हजार 179 इतकीझाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 31 देशात आतापर्यत लाख 7 हजार 223 जणांनी करोनावर मात केली आहे. 8 लाख 46 हजार 395 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.